शाही गट्टे




Shahi Gatte :

This one is the Rajasthani dish. Rajasthani dishes generally made with curd or yogurt. We can enjoy it for lunch or dinner  with hot chapatis. It is made with gram flour. Perfect gravy enhance the taste of recipe.

Shahi Gatte

साहित्य :- गट्टे साठी  दोन वाट्या डाळीचे पीठ, एक टीस्पून जिरे पूड, मीठ -तिखट चवी नुसार, ओवा एक टीस्पून, एक टेबलस्पून  तेल.

रश्या साठी – एक वाटी दही, एक टिस्पून गरम मसाला, तेल, हळद, धणेपूड, मीठ, लाल -तिखट, हिंग, मोहरी, लवंग, दालचिनी, सुक्या लाल मिरच्या, चिरलेली कोथिंबीर.
कृती :-  गट्टे चे  साहित्य एकत्र करून घट्ट मळावे. त्याचे मघ्यम जाडीचे लहान दोन रोल करावे. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे त्यात हे दोन रोल घालून १५ मिनिट उकडावे. पांढरट दिसू लागले म्हणजे शिजले असे समजावे. पाण्यातून काढून चाळणीवर निथळत ठेवा. गार झाल्यावर लहान लहान कापून गोल चकत्या कराव्या या चकत्यांना गट्टे म्हणतात. एका पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी-लवंग-हिंग -दालचिनी -सुक्या लाल मिरच्या घालावे  परतून लाल तिखट- मीठ-हळद-धने पूड घालून गट्ट्याचे पाणी घालावे. उकळी आल्यावर दही घोटून घालावे. कोथिंबीर गरम मसाले,  गट्टे टाकून ग्यास बंद करावे.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड