फेसबुक विध्यार्थ्यान करीता घातक




फेसबुक विध्यार्थ्यान करीता घातक

facebook is not safe to your children
फेसबुकच्या जाळ्यात ओढल्या जाणार्‍या युवकांचे प्रमाण शहरात पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. त्यातील काहींच्या घरी इंटरनेट आहे, तर अनेकांनी खास फेसबुकसाठी मोबाईल घेऊन त्याद्वारे संपर्क कायम ठेवले आहेत. सरासरी दिवसाकाठी तासभर फेसबुक वापरणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही.

शालेय तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या सुमारे २0 विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यातील ११ विद्यार्थी फेसबुकचा वापर करतात, असे आढळून आले. त्यातील दोन मुले मोबाईलवर, चार मुलांकडे घरी संगणक, तर पाच मुले सायबरकॅफेत जाऊन फेसबुक वापरतात असे दिसून येते. त्यात शालेय मुलांचे प्रमाणही मोठे आहे.

संपर्काचे माध्यम

महाविद्यालयातून घरी आल्यानंतर मित्रांशी संपर्क ठेवणे अथवा पसरलेल्या शालेय मित्रांना शोधून त्यांच्याशी असलेले मैत्रिबंध टिकविणे आणि नवे मित्र निर्माण करणे यासाठी फेसबुकचा वापर करतो. सायबर कॅफेत जाऊन फेसबुकचा वापर करण्याऐवजी घरच्या संगणकावर इंटरनेट घेऊन त्याचा वापर करणे परवडते. त्यामुळे घरीच त्याचा वापर करतो. दररोज त्याचा वापर करायला वेळ मिळत नसला तरी दोन, तीन दिवसाआड त्याचा वापर करतो आणि शक्यतो रात्रीच्या वेळेस सर्व मित्र ऑनलाइन असतो. आमचा सर्व ग्रुप फेसबुकवर आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड